वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आता वेस्ट इंडिजला क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत.४ मार्च ते २५ मार्चदरम्यान झिम्बाब्वे मध्ये क्वालिफायर मॅच खेळवण्यात येणार आहेत. या क्वालिफायर मॅचमध्ये वेस्ट इंडिजबरोबर अफगाणिस्तान, आयर्लंड, झिम्बाब्वे, हाँगकाँग, नेदरलँड, स्कॉटलंड आणि पपुआ न्यूगिनी या आठ टीम सहभागी होतील. ३० सप्टेंबर २०१७च्या आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये टॉप ८ टीममध्ये नसल्यामुळे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांना क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत.आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर मध्ये भाग घेणाऱ्या टीमचा पाच-पाचचा ग्रुप बनवण्यात येणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews